मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वसमतमध्ये 'सेवा यज्ञ – महारक्तदान संकल्प सोहळा'; १९४ जणांचे विक्रमी रक्तदान

Fri 24-Jul-2026,10:40 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वसमतच्या वतीने "सेवा यज्ञ – महारक्तदान संकल्प सोहळा" या सामाजिक उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी कार्यालय, मामाश्री कॉम्प्लेक्स, नांदेड रोड, वसमत येथे करण्यात आले. समाजहिताच्या उद्देशाने आयोजित या रक्तदान शिबिराला पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरात एकूण १९४ रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपाचे BLA-1 वसमत विधानसभा प्रमुख आतिश भैय्या दांडेगावकर यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळली. तसेच विधानसभा क्षेत्रातील चारही मंडळांचे अध्यक्ष विष्णू बोचकरी, अवधूत शिंदे, ज्ञानेश्वर मुंजाळ आणि राजू पाटील आहेर यांनी गावागावांत संपर्क मोहीम राबवून रक्तदात्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी (नांदेड) येथील वैद्यकीय पथकाने मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व रक्तदाते, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान, रक्तदान म्हणजे जीवनदान" हा संदेश देत भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवदास बोड्डेवार, खोब्राजी नरवाडे, गणेश कमळू, डॉ. मारोती क्यातमवार, आदित्य देशपांडे, शिवाजी अलडिंगे, विजय नरवाडे, अमोल मुळे, बालाजीराव जाधव, सीताराम म्यानेवार, मयूर नावंदर, माणिकराव सावंत, भगवान कुदाळे, राजेश भालेराव, गोविंद येजगे, डॉ. मारोती बुट्टे, प्रभाकर रेंगे, भारत स्वामी, गजानन पप्पलवाड, ग्यानोजी काळे, शुभम शिंदे, स्वप्निल मुळे, संजय कळणे, अविनाश गायकवाड, शिवाजी गोरे, दिलीप पवळे, सुनिल आकाशे, बालाजीराव जांभळे, संजय सूर्यवंशी, मोईन इनामदार, केदार भालेराव, रवि सूर्यवंशी, सिताराम जाधव, नागनाथ डाढाळे, कृष्णा भालेराव, सुमित शिंदे, मयूर अंबेकर, विष्णू शहाणे, अर्जुन बेंडे, संदीप भालेराव, गोपाळ माने, संजय सवंडकर, शिवम नामेवार, माणिक पांचाळ, नारायण सातपुते, विष्णुकांत माखने, दिलीप गजभार, गोविंद शिंदे, बाबाराव शिंदे, ऋषिकेश शेळके, देवानंद क्षिरसागर, अभय शिकारी, गोपाळ चकोर, विष्णुकांत सातपुते, रमेश नामेवार, संदीप ढाले, उद्धव शिंदे, सिद्धार्थ दवणे, ईश्वर नरवाडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.