वृक्षारोपणाने केली युवारंग समर कॅम्प ची सुरुवात

Thu 01-May-2025,12:28 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली 

युवारंग समाजातील विद्यार्थ्याना घडविणारे संघटन:- श्रीपाद वटे सर 

आरमोरी :- युवारंग बहुउद्देशीय संस्था आरमोरी तर्फे मागील ८ वर्षापासून दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी समर कॅम्प चे आयोजन केले जाते हीच परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले या समर कॅम्प चा उद्घाटन सोहळा आज दिनांक १/५/२०२५ गुरूवार ला सकाळी ६:३० वाजता स्वामी विवेकानंद विद्यालय येथे पार पडला याप्रसंगी राजमाता जिजाऊ श्री.छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पार पडला याप्रसंगी या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीपाद वटे सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  युवारंग चे संस्थापक राहूल जुआरे तर प्रमूख अतिथी म्हणून स्वयं रक्तदाता समिती चे अध्यक्ष चे अध्यक्ष चारुदत्त राऊत सर,धाईत सर,गणगोत सर, दहिकार सर, रोहीत बावनकर,मनोज गेडाम, पंकज इंदुरकर,महेंद्र मने, लिलाधर मेश्राम उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचे महत्त्व सांगण्यात आले .