जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन आणि बालकल्याण समितीची आढावा बैठक

Wed 30-Apr-2025,01:56 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन आणि बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळची त्रैमासिक आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात बाल सुरक्षा, बालशोषण, बालविवाह, बालकामगार सारख्या समस्यांना गांभिर्याने घेऊन त्वरित कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी बैठकीचा उद्देश व त्रैमासिक आढावा सादर केला.यावेळी क्षमा बासरकर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका पोलिस स्टेशन येथे बालस्नेही पोलिस मदत केंद्र स्थापन करणे तसेच शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे बालस्नेही वॉर्ड (कोपरा) तयार करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाबाबत चर्चा करून पोलिस विभाग तथा आरोग्य विभाग यांनी योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांना बालस्नेही पुरस्कार व विविध विकास निर्देशांकात चंद्रपूर जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.सदर बैठकीला निवासी जिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदसय् मोहितकर, देशमुख, दिवाकर महाकाळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच पोलिस विभाग, मनपा चंद्रपूर, कामगार कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.