शिवसेना तर्फे "पाणी प्याऊ" चे उद्घाटन करण्यात आले

प्रतिनिधी:मंगेश लोखंडे हिंगणघाट
वर्धा:संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट येथे काल दि.30/4/2025 बुधवारला वं.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या 80%समाजकारण व 20%राजकारण या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून वर्धा जिल्हाप्रमुख गणेश ईखार व शुभांगी ठमेकर यांच्या आदेशावरून राजु हिंगमिरे जिल्हासंघटक वर्धा यांच्या नेतृत्वाखाली तिसरा "पाणी प्याऊ"सुरू करण्यात आला.दिवसेंदिवस तापमानात होत असलेली वाढ व त्यामुळे वाटसरुना उन्हात बाहेर पडल्यानंतर स्वतःची तान्हं भागवता यावी म्हणून हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा छंद जोपासला आहे.त्या उद्घाटन समारंभ प्रसंगी नव्याने नियुक्त केलेले हिंगणघाट विधानसभा संघटक सतिश चौधरी,तालुकाप्रमुख हिंगणघाट अमित गावंडे,उपजिल्हाप्रमुख युवासेना दिनेश काटकर, कुलभूषण वासनिक,सतिश तांबोळी,घुंगरडजी,प्रतिक चापले,व समस्त शिवसैनिक तसेच प्रभागातील नागरीक आवर्जून उपस्थित होते.