भरधाव टिप्परने ऑटोला दिली जोरदार धडक २ ठार ३ जख्मी

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत कवठा रोड वरील मदिना चौक जवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या टिप्परने ऑटोला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले आहेत तर ३ जण जख्मी आहेत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक ३ मे रोजी दुपारी १:१५ वाजण्याच्या सुमारास कवठा रोडवरील मदिना चौक जवळ पिण्याच्या पाण्याची बॉटल घेण्यासाठी थांबलेल्या ऑटो क्रमांक एम.एच-३८ ०१९७ ला वीट भट्टी साठी लागणारी माती घेऊन मागून येणारे टिप्पर क्रमांक एम.एच २० सिटी ९७९७ ने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात यास्मिन बेगम मोईन खान वय अंदाजे २८ वर्ष राहणार मनमाड व शोएब खान जलील खान वय अंदाजे १६ राहणार कुरुंदा ता वसमत दोन जण जागीच ठार झाले तर अफ्फान मोईन खान वय ५ वर्ष राहणार मनमाड व आझाद मोईन खान वय ७ वर्ष राहणार मनमाड हे दोन मुलं गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे दाखल करण्यात आले होते त्यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे माहिती शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी,रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होते अपघात एवढा भीषण होता की ऑटोतील वृत्त व जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनची साहयता घ्यावी लागली