उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई

प्रतीनीधी आसीफ मलनस हिंगणघाट
वर्धा:दि 03-05-2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की आरोपी (1) अजय लोभेश्वर दाते, वय 31 वर्ष , रा . निशानपुरा वॉर्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट हा मालक आरोपी क्र (2) राजू उपाध्ये,रा तेलिपुरा वॉर्ड, हिंगणघाट याचा सांगणे वरून त्याच्या ताब्यातील बिना क्रमांकाचा लाल रंगाच्या महिंद्रा कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये वना नदीच्या पात्राचे बोरखेडे घाट येथून काळी रेती चोरून हिंगणघाट शहर कडे वाहतूक करीत आहे अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी क्र 1 च्या ताब्यातील ट्रॅक्टर यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काडी रेती( गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिडून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास काडी रेती (गौन खनिज ) असा जु कि 8,06,000/- रु चा माल मिडून आल्याने , पो स्टे, हिंगणघाट येथे परत येवुन आरोपीतान विरूध्द गुन्हा नोंद केला सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा.अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित सा यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे यांनी केली