रोटरी क्लब च्या वतीने बेघर आश्रमात व्यायाम,प्राणायम व वैघकीय तपासनी शिबीर

सोशल वर्क हिंगनघाट हेल्थ

रोटरी क्लब च्या वतीने बेघर आश्रमात व्यायाम,प्राणायम व वैघकीय तपासनी शिबीर

प्रतिनिधी:निखिल ठाकरे

हिंगणघाट:- रोटरी क्लब च्या वतिने बेघर व निराश्रीत आश्रमात वास्तव्यास असलेल्या लोकांना प्राणायम व व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात आले.
या आश्रमात जवळपास २२ निराश्रीत वास्तव्य करीत आहे.यात काही शारीरीक व्यंग तर काही मानसीक रुग्ण आहे.तसेच काही वृध्द असल्यामुळे काम करण्यास असमर्थ आहेत.शासनातर्फे त्यांना दोन वेळेस जेवन नास्ता,चहा पाणी प्राप्त होते.
परंतु शारीरीक तंदुरुस्तीसाठी प्राणायाम व व्यायामाचीही आवश्यक्ता आहे.यासाठी रोटरी क्लबने दर महीण्याच्या पहिल्या सप्ताहात त्यांची वैद्यकीय तपासनी करुन आवश्यक औषधि पुरवितात, तसेच व्यायाम व प्राणायामही करुन घेतला.
याप्रसंगी डाँक्टर अशोक मुखी यांनी वैद्यकीय तपासनी केली.तर डाॅ.सतीष डांगरे,अतुल हुरकट ,पुंडलिकजी बकाने ,अध्यक्ष प्रा.केदार यांनी प्राणायमाचे प्रात्याक्षीक करुन दाखविले यात अणुलोम विलोम ,दिर्घ श्वास ,कपालभाती यासारखे अनेक प्राणायम करुन घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा अशोक बोंगीरवार , माया मिहानी ,जितेंद्र वर्मा , प्रा राजु निखाड़े ,अशोक डालीया यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.