वसमत शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराचा गजब कारभार चोर सोडून संन्यासाला फाशी

Thu 08-May-2025,01:30 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत येथील पत्रकार DC9 मराठी न्यूज चैनल चे संपादक देविदास चपटे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे व वसमत शहरातील नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्या नंतर वसमतच्या मंगळवार बाजारातुन जनावरांची होणारी अवैध वाहतूक व कत्तली संदर्भात बातमी प्रकाशित केली होती.. ही बातमी प्रकाशित केल्यानंतर खरंतर पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांवर तर पोलीस प्रशासनाकडून खुलेआम जनावर कत्तलीसाठी नेणाऱ्या इसमांवर कडक कायदेशीर कार्यवाहीची अपेक्षा असताना चोर सोडून संन्याशाला फाशी या उक्तीप्रमाणे वसमत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर वाघ यांनी उलट पक्षी पत्रकार देविदास चपटे यांनाच नोटीस देऊन कुठल्या पुरावांच्या आधारे ही बातमी तयार केलीत अशी विचारणा केली तसेच सदरील घटने संदर्भात आम्हाला का माहिती दिली नाहीत याबाबत खुलासा मागविला आहे.. हा पत्रकाराला दडपवण्याचा प्रकार असून पत्रकारांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने अशाप्रकारे पत्रकाराला नोटीस देण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.. याचा ठाणेदारांनी ही खुलासा करावा अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात येत आहे तसेच पत्रकाराला नोटीस दिल्यामुळे सर्व पत्रकारांमध्ये या प्रकाराबाबत नाराजी असल्याच पहावयास मिळत आहे, वसमत शहरातील नागरिकांनी व विविध संघटनांनी यापूर्वी या संदर्भात अनेक निवेदन दिली पण म्हणावी तशी काही ठोस कार्यवाही कधी झाल्याचे पहावयास मिळाले नाही नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर व विविध संघटनांच्या संतप्त प्रतिक्रिया व परिस्थिती जण्य पुराव्याच्या आधारे पत्रकार देविदास चपटे यांनी सदरील बातमी केली होती या बातमीनंतर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे जनावरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही वसमत शहरात गोवंशाची खुलेआम कत्तल होत असताना यावर प्रतिबंध आणण्या ऐवजी पत्रकारालाच नोटीस देऊन दडपवण्याचा तर हा प्रयत्न नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाचा तपास करण्या ऐवजी दोशींवर ठोस कार्यवाही करण्या ऐवजी पत्रकारा वरच दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय याचा अर्थ अवैध गोहत्या करणाऱ्यांशी पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण संबंध तर जुळलेले नाहीत ना असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.. जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणे हा महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम 1976 कलम 5(अ) प्रमाणे दखलपात्र गुन्हा असून आता या प्रकरणी काय कार्यवाही होणार वसमत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वसमत शहरातील जनावरांच्या अवैध वाहतुकीवर व कत्तल्ली करणाऱ्या लोकांवर काय कार्यवाही करण्यात येणार याकडे हिंगोली जिल्ह्यासह सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे व गोरक्षकांचे लक्ष लागले आहे.