घरफोडीचा गुन्हा १२ तासाच्या आत उघड ३ आरोपी अटक पोलीस स्टेशन रामटेक यांची कामगीरी

प्रतिनिधी इमरान मालधारी रामटेक
नागपुर:पोलीस स्टेशन रामटेक फिर्यादी नामे निलेश जगन मुळे, वय ३२ वर्षे, रा. वार्ड क्र. ०२ नगरधन, ता. रामटेक जि.नागपुर यांनी पोलीस स्टेशन रामटेक येथे रिपोर्ट दिली की, दिनांक ०२/०५/२०२५ रोजीचे रात्री ०८/०० वा. ते दिनांक ०३/०५/२०२५ चे दुपारी ०२/०० वा. दरम्यान फिर्यादीचे घराचे समोरील दाराचे लॉक तोडुन आत प्रवेश करुन बेडरुम मध्ये लोखंडी आलमारीचे लाँक तोडुन लॉकर मधील ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने एकूण किंमती ७२,७५०/- रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन रामटेक येथे ३३१(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद अप क्र. ३४८/२०२५ कलम ३०५ (ए),३३१ (४), आहे. रमेश धुमाळ, अपर पोलीस अधिक्षक (प्रभारी पोलीस अधिक्षक) नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या आदेशाने रमेश बरकते, उपविभागिय पोलीस अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन रामटेक चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी सदर गुन्हा उघडीकीस आणण्यासकामी पोलीस स्टेशन रामटेक येथील गुन्हे प्रकटीकरण पथका मधील अंमलदारांचे पथक तयार केले. सदर पथकाने तांत्रिक पुरावे आणि गुप्तबातमीदारा मार्फतीने सदर गुन्हात आरोपी क्र. १) रामा उर्फ बांड्य मारोती दांडेकर, वय २३ वर्षे, रा. गिट्टीखदान नागपुर आरोपी क्र. २) बबलु अंबादास दांडेकर, वय २७ वर्षे आरोपी क्र. ३) गोलु अंबादास दांडेकर, वय २४ वर्षे, दोन्ही रा. गंगानगर वाडी रोड नागपुर या आरोपीचा १२ तासाच्या आत शोध घेवुन त्यांच्या कडे सखोल विचारपुस करून आरोपीतांना अटक केली.आरोपीकडून पिवळया आणि पोढऱ्या धातुचे दागिने एकूण किंमती ५१,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.न्यायालयाने नमुद आरोपीतांचा दिनांक ०८/०५/२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.