१३ वर्षानंतर आमगावखुर्द येथील नागरिक बजावणार मतदानाचा हक्क नगर पंचायत वासियांच्या सुप्रीम दिलाशा

Thu 08-May-2025,11:20 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा 

सालेकसा -सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे येणाऱ्या चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपंचायत च्या निवडणुका घेण्यात यावे तसेच निवडणूक आयोगाने चार आठवड्यात अधिसूचना जाहीर करावे असे आदेश दिले या निर्देशाप्रमाणे सालेकसा नगरपंचायत क्षेत्रातील आमगावखुर्द या भागातील नागरिकांना आपल्या संस्थेत आपला हक्क मत बजावण्याची संधी उपलब्ध होणार आहे .१३ वर्षापासून स्थानिक नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित नगर पंचायत सालेकसा क्षेत्रात समाविष्ट झालेली ग्रामपंचायत आमगावखुर्द येथील नागरिकांना मागील तेरा वर्षापासून मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळालीच नाही. या ठिकाणी सन २०१२ मध्ये ग्रामपंचायत ची निवडणूक झाली होती यानंतर ग्रामपंचायतचे कार्यकाळ २०१८ मध्ये संपला त्यानंतर आमगावखुर्द ग्रामपंचायतला नगरपंचायत सालेकसा मध्ये समाविष्ट करण्यात आले परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न लागण्याने येथील नागरिकांना आपल्या मतदानापासून वंचित राहावे लागले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे येणाऱ्या चार महिन्याच्या आत निवडणूक घेण्याचे निर्देश मिळाल्याने येथील नागरिकांना मतदानाची उत्सुकता वाढली असून प्रतिनिधित्व करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांची वर्दळ सुरू झाली आहे. हा समाविष्ट झालेला आमगावखुर्द चा भाग मागील आठ वर्षापासून प्रतिनिधित्व विहिन आहे.कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी नसल्याने कामकाजात विकास कार्यात मोठी कसरत करावी लागत आहे.नगरपंचायत सालेकसा क्षेत्रात मोडत असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा निवडणुक न झाल्याने याचा फटका बसला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी या नगरपंचायत चा कार्यकाळ संपला असून प्रशासनाच्या अधीन या नगरपंचायतचे कार्यभार सुरू आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने निवडणुकीची उत्सुकता यांच्यामध्येही वाढली आहे.

बॉक्स 

 सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो, उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आमगावखुर्द ला सालेकसा नगरपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात आले.पण मागील आठ वर्षांपासून निवडणूक झाली नाही आता लोकांना जनप्रतिनिधी म्हणून कार्य करण्याचे संधी मिळेल

ब्रजभूषण बैस ,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसा 

बॉक्स 

आम्ही येथिल स्थानिक नागरिक असून मागील १३ वर्षापूर्वी मतदान केलो होतो. तेव्हा पासून आम्हाला मतदान करण्याची संधी मिळाली नाही. आता येणाऱ्या चार महिन्यात निवडणूक लागेल तर आम्ही मतदान करण्यास उत्साही आहोत.

   सुनिल असाटी, स्थानिक नागरिक आमगावखुर्द