अल्लीपूरात पिण्याच्या पाण्याचा कृत्रिम तुडवडा: लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचा खेळखंडोबा

सुनिल हिंगे : (अल्लीपुर )
लोकसंख्येच्या दृष्टीने जिल्हात मोठ्या असलेल्या अल्लीपूर गावाला कृत्रिम पाणी टंचाईचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे तर काही भागात दूषित पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने रोगराई पसरन्याची शकता नाकारता येत नाही,याकडे मात्र थेट लोकप्रतिनिधीसह प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या अनुषंगाने स्थानिक महाविकास आघाडी यांनी थेट ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देवून पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्थळावर “मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार”आपली असल्याचे निर्देशनात आणून दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की,लोकसंखेने मोठ्या असलेल्या अल्लीपूर गावात मागील अनेक वर्षापासून पाणी टंचाई होती मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधी माजी आमदार रणजित कांबळे यांनी गावाला पाणी टंचाईतून मुक्त करण्यासाठी ‘जीवन प्राधिकरण’ योजना राबवली आणि गावाला पाणी टंचाईतून मुक्त करण्याच काम केल होत,परंतु यानंतर जीवन प्राधिकरण (जिल्हा परिषद पाणी पुरवठा) आणि जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर जल ,हर घर नल” ही योजना राबविण्यात आली त्याचे काम पण मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आले परंतु,लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सदर योजना फोल ठरल्याचे चित्र दिसून येत आहे,अल्लीपूर गावाला पाणी टंचाई जाणवत आहे,एकीकडे मोठ्या प्रमाणात नळपाणी शुल्क वसुली करायची,दुसरीकडे लोकांना पाण्यासाठी भटकंती करायला लावायची या चुकीच्या धोरणाविरुद्ध आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आक्रमक होत थेट ग्रामविकास अधिकारी यांना पाण्याचे नियोजन करून सुरळीत पाणीपुरवठा करावा किवा ज्या भागात पाणी पोहचत नाही अश्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा व गावातील प्रत्येक भागापर्यंत शुद्ध पाणी पोहचावे अश्या आशयाचे निवेदन दिले आहे,यावेळी राकांचे गजानन नरड,सचिन पारसडे,कांग्रेसचे श्रीराम साखरकर,शिवसेनेचे गोपाल मेघरे,शिवराया संघटनेचे नितीन सेलकर,उमेश ढगे ,अमरदीप कांबळे,रोशन नरड,विकास गोठे ,रत्नाकर वैद्य,वसीम कुरेशी,समीर शेख व आदी गावकरी उपस्थित होते