बल्लारपूर तालुक्यात नि:शुल्क मोतिबिंदू नेत्र तपासणी रुग्णांवर होणार नागपुरात शस्त्रक्रिया

Tue 06-May-2025,08:24 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर:राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर तालुक्यात दोन ठिकाणी एकाच दिवशी निःशुल्क मोतिबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर यांच्या वतीने नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटरच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरातील तपासणीमध्ये ज्यांना दृष्टीदोष आढळून आला त्यांच्यावर नागपूर येथे शालिनीताई मेघे हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे.राजकारणापेक्षा समाजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आमदार मुनगंटीवार यांनी स्थान मिळविले आहे.नागरिकांच्या सोयी-सुविधांसोबतच त्यांच्या आरोग्याचीही ते काळजी घेत असतात. त्याचदृष्टीने त्यांच्या पुढाकारातून दत्त मंदीर देवस्थान, नांदगाव (पोडे) ता. बल्लारपूर आणि जगन्नाथ बाबा मठ, ग्रामपंचायत समोर हडस्ती, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले.विसापूर येथील २५, तर नांदगांव पोडे येथील १२ रूग्‍णांवर नागपूरमध्ये मेघे हॉस्पिटलमध्ये निःशुल्क शस्त्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना चंद्रपूर येथून नागपूरला नेणे व परत आणून सोडणे, याची व्यवस्था रुग्णालयाच्या वतीने करण्यात येणार आहे.रुग्णांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार -शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. तपासणी, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया निःशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.आतापर्यंत ३५ हजारांच्यावर नागरिकांना मोफत चष्मे वितरीत करण्यात आले व १५ हजारांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.