रेती अभावी घरकुलांच्या बांधकामास ब्रेक लाभार्थ्यांना पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आमदार रामदास मसराम यांनी जाणल्या घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या
आरमोरी - जिल्हात नव्या वाळू धोरणानुसार शासनाने घरकुल बांधकामासाठी गरजु लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा केली मात्र पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपल्यावरही वाळू उपलब्ध होत नसल्याने मोफत वाळू धोरणाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे रेती अभावी घरकुल गरजु लाभार्थ्यांना मोठ्या ब्रेक लागला असुन पावसाळ्यात उघड्यावर राहण्यासाठी वेळ येणार असल्याचे आमदार रामदास मसराम बोळधा गावाला भेट दिली घरकुल लाभाथ्याच्या घरकुल बाधकामाची पाहणी केली असता स्वतः लाभार्थ्यांनी आमदार मसराम यांना समस्या सांगितले असता कसलाही न लावता जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने गरीब गरजू घरकुल लाभार्थ्यांच्या पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली.गडचिरोली जिल्ह्यात गरजु घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना आणि शबरी आवास योजनेंतर्गत तालुक्यात सह जिल्हात हजारों घरकुल मंजूर झाले आहेत. परंतु या लाभार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा रेतीने केला आहे. यात विशेष म्हणजे, चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध होत असली तरी ती अधिकच्या किमतीत रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे आहे. परिणामी हजारों घरकुलाचे बांधकाम खड्डे खोदून कालम उभे केले तर काहींचे फोडेशन झाले आहेत या पुढे रेती अभावी घरकुलांच्या कामाना ब्रेक लागले असता पंचायत समिती स्तरावरुण घरकुल बांधकाम करण्यास लाभार्थ्यांना तगादा लावला आहे पण घरकुल बाधायचे तरी कशानी पहिलेच फक्त पहिला हप्ता 15 हजार देण्यात आले त्या वेळी सळाख सिमेंट गिल्टी ई साहीत्य उधारीवर घेतला परंतु तेव्हा पासून एक रुपयाही मिळाला नसल्यामुळे दिवस बरेच झाल्याने मटेरियल सप्लायर यांनी पैसे साठी तगादा लावला असल्यामुळे घरकुल लाभार्थी रेती व अनुदानामुळे चारही बाजूंनी कचाट्यात सापडले असल्याच्या समस्या आरमोरी तालुक्यातील बोळधा येथील गरीब गरजू घरकुल लाभार्थ्यांनी आमदार रामदास मसराम बोळधा गावाला भेट दिली असता घरकुल लाभाथ्याच्या घरकुल बाधकामाची पाहणी केली असता स्वतः लाभार्थ्यांनी आमदार मसराम यांना समस्या सांगितले असता कसलाही न लावता जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने गरीब गरजू घरकुल लाभार्थ्यांच्या पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या समधी आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांनी आरमोरी देसाईगंज कुरखेडा कोरची धानोरा तालुक्यासह जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यासमधी जिल्हाधिकाऱ्यांना दुरध्वनी वरुण मागणी केली असता आपल्या स्तरांवरुण आदेश तहशिलदाना निगसित दिला आहे असे आश्वासन देल्याने आता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत्याचा मागं मोकडा झाला आहे.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष भुपेश कोलते गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम पंचायत समिती माजी सभापती तुलाराम गेडाम,अरविंद फटाले,उपसरपंच प्रमोद भोयर,प्रकाश मेश्राम,लालाजी सहारे,निकेत राऊत,अशोक खेवले,नितेश वलके,विश्वनाथ कावरे,कालीदास झरकर,अतुल राऊत,सुदरा कुमरे,दुधराम ठाकरे,उत्तर बाई चुधरी,सजीखा पठाण,नामदेवराव कायरे,लक्ष्मण झरकर,भाऊराव कुकडे,सिध्दांथ झरकर,लोकेश चुधरी यासह अन्य घरकुल लाभार्थी उपस्थित होते.