जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

Sat 24-Jan-2026,03:09 AM IST -07:00
Beach Activities

जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधि: नदीम शेख

 हिंगणघाट:हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्य तसेच देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना(शिंदे गट) हिंगणघाट विधानसभा मतदार संघाच्या वतीने करण्यात आले.

या प्रसंगी श्रध्देय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन प्रतिमेचे पुजन करण्यात आले तसेच सुभाष चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाळासाहेबाच्या साठी घोषणा देण्यात आल्या तर देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयजयकार करण्यात आला. याप्रसंगी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा व शिवसेना पक्षाच्या स्थापना कार्याविषयी माहिती देण्यात आली. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेना यांचे भारतीय स्वतंत्र संग्रामातील अभूतपुर्व योगदाना बददलची जाणिव आजच्या पिढीने लक्षात ठेवली पाहीजे असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.

या नंतर वृक्षारोपन कार्यक्रम सुध्दा घेण्यात आला. सोबतच सरकारी दवाखान्यात रूग्णांना फळ व बिस्कीट पॉकीटचा वाटप आजच्या कार्यक्रमाच्या निमित्याने करण्यात आला.

वरील कार्यक्रमाला न.पा. हिंगणघाटच्या नगराध्यक्ष सौ नयनाताई तुळसकर प्रामुख्याने उपस्थित होत्या तसेच पक्षाचे पदाधिकारी श्री सतीश चौधरी सर, विलास हांडे (उपशहर प्रमुख), सोनु लांजेवार, प्रतिक चाफले, अनिकेत लासटवार, गणेश कोल्हे, विशाल पुरनाके, सतिष तांबोळी, तुळसीराम डफ, धिरज सिडामे, गणेश बावणे, भारत मने, मंगेश बावणे, कुलभूषन वासनिक, संजय कोपुलवार, महिला पदधिकारी सुनिताताई तांबोळी (शहर प्रमुख), रजनीताई गोस्वामी, कांता झोरे, विधी चौव्हान, गुंफा रोठे व महोदय वयोवृध्द पुरूष शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित हाते. तसेच सर्वाचे मनपुर्वक अभार राजु हिंगमीरे विधानसभा संघटक प्रमुख यांनी मानले.