गोयंका यांच्या टेक्सटाईल्स मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीना त्वरित अटक करून कंपनीच्या कारभाराची चौकशी करा

अब्दुल कदीर बख्श हिंगणघाट
इंटक महासचिव आफताब खान यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
वर्धा:हिंगणघाटरोडवरील रायफुली येथील विश्वत्रिवेणी टेक्सटाईल्समध्ये एका अल्पवयीन किशोरीवर बलात्कार करणारे आरोपी फरार असून अद्यापपावेतो या दोघांही नराधमांना अटक न झाल्याने जनतेत संतप्त वातावरण आहे.त्यामुळे या आरोपीना अटक करून कंपनीची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे महासचिव श्री आफताब खान यांनी एका निवेदनातून दिला असून या प्रकरणाची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी जी एम गुरुमूर्ती हा कंपनीचा व्यवस्थापक असून दुसरा आरोपी मोबीनखान हा त्याचा सहकारी आहे. सदर कंपनी ही येथील प्रतिष्टीत समाजसेवी डॉ मधुसूदन गोयनका यांच्या मालकीची आहे.सदर कंपनीत ही मुलगी आपल्या आई सोबत राहत होती. व अल्पवयीन असूनही कंपनीत अवैधपणे कामावर होती.घटना घडली त्यावेळी सदर मुलगी ही पॅकिंग रूममध्ये काम करीत होती यावरून या कंपनीत नियमबाह्य पद्धतीने अल्पवयीन कामगारांना कामावर ठेवण्यात आल्याचे दिसून येते व कंपनीत राहतं असलेल्या महिलांना पुरेशी सुरक्षा कंपनीच्या संचालकांकडून पुरविण्यात येतं नसल्याचे दिसून येत आहे.त्या मुळेच कंपनीच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी करून महिला कामगारांना सुरक्षा, कामगारांना सरकारी नियमानुसार वेतन देण्यात येते की नाही. दि 4 में ला घडलेल्या विकृत घटनेत अजून कोणा कोणाचा हात आहे याची सविस्तर चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून इंटक तर्फे करण्यात आलेली आहे.या प्रकरणी पोलीसांनी विनाविलंब चौकशी करावी अशी मागणी इंटकचे महासचिव आफताब खान यांच्या सह राष्ट्रीय मिल मजदूर संघांचे पदाधीकारी बंडू काटवले,संतोष माथनकर, प्रभाकर देवतळे,जीवन दलाल,रमेश भोंग,सचिन चिंचोळकर,विलास धोबडे एकनाथ दिखाते दीपक फर्रडे दशरथ वैरागडे,वासुदेव मुड़ेवार यांनी एका निवेदनातून केली आहे.