*शेतकरी बांधवांना बियाणे टोकणयंत्राचे प्रशिक्षण,कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*
प्रतिनिधी :- शारुखखान पठाण , चिकणी , वरोरा , ( महाराष्ट्र )
वरोरा: जगाचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाढता कल व दिवसेंदिवस मजुरांची भासती कमतरता, ही बाब लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समिति द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा च्या अंतिम वर्षातील विद्यार्थीनींनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकरी वर्गही आधुनिकतेकडे वळावा, थोड्यातरी प्रमाणात स्वावलंबी व्हावा या हेतूने गट ग्रामपंचायत टाकळी येथे टाकळी सेवा समितीचे सचिव अक्षय क्षीरसागर यांच्या सहकार्याने शेतकरी बांधवांना बियाणे टोकणयंत्र (Hand push seeder) चे प्रात्यक्षिक देऊन त्याबद्दल सविस्तर माहिती दिली व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. हे यंत्र वेगवेगळ्या बियाण्यांच्या पेरणी करिता वापरले जाऊ शकते. हे यंत्र एक व्यक्ति अगदी सहजरीत्या हाताळू शकतो त्यामुळे मजुरांचा लागणारा अतिरिक्त खर्च वाचतो. ठराविक अंतर, खोली व ठराविक बियाणे हे या यंत्राची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
या विद्यार्थीनीं मध्ये प्रियंका हरिभाऊ वैद्य, कोमल सुरेश उईके, वंशिका नरेंद्र तिरणकर, व महिमा हरिदास वैद्य आदींचा समावेश होता. यासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोराचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वी. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एन पातोंड, डॉ. पी. के. आकोटकर व डॉ. एस. आर. ईमळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.