जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला येथे मंत्रिमंडळ गठीत* ‌

शिक्षा


प्रतिनिधी :- आकाश बावनकर , साखरीटोला , गोंदिया ( महाराष्ट्र )

सखारीटोला :- नुकताच स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साकरीटोला येथे लोकशाही पद्धतीने शांततापूर्व वातावरणात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत मतदानाचा हक्क पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी बजावला. *शाळा नायक* युवराज पंधरे, *उपशाळानायक* संवेदी पडोळे, *सांस्कृतिक प्रमुख* प्रणय बावनथडे, *उपप्रमुख* दीपा कोरे, *विद्यार्थिनी प्रतिनिधी* चेतना राऊत, *उपप्रतिनिधी* निकिता बिसेन, *क्रीडा प्रमुख* चंदन मेहर, *उपप्रमुख* काजल डोये, *सहल प्रमुख* अंतरा खोब्रागडे, *उपप्रमुख* हर्षिता कोरे, *स्वच्छता व आरोग्य प्रमुख* महेक भस्के, *उपप्रमुख* महिमा पटले, *परिपाठ प्रमुख* प्राजक्ता मुनेश्वर, *उपप्रमुख* अंजली सोनवाने, *तंटामुक्त प्रमुख* नयन बावणे, *उपप्रमुख* गौरव सिंह राठोड या विद्यार्थ्यांची मंत्रिमंडळात निवड झाली.प्राचार्य एन.ए.आसोले यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रीमंडळ निवडणूक आर.एस.मेश्राम, एस.एम.गोदे,एस.डी.मडावी, के.बी.सराटे,एस एच.कटरे, टी.एस.गावडकर, ए.जी. कापगते,प्रा.जी.एम.बोंबार्डे,एस.बी.कटरे,शंकर पटले, कु.एस.बी.कटरे, बिसेन मँडम, टी.वाय. पवार, कु.एम.पी.मस्के मँडम व चतुर्थ कर्मचारी यांनी पार पाडली.निवडून आलेल्या शालेय मंत्रीमंडळातील विद्यार्थ्यांचे पुस्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.