सभापतिपदी केशवराव मानकर तर उपसभापतिपदी राजेश भक्तवर्ती

अन्य राजनिती

आमगाव कृउबामध्ये कमळासह आता होणार घड्याळाची टिकटिक

 

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)

 

आमगाव स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक बुधवारी (दि. २४) संस्थेच्या सभागृहात घेण्यात आली. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीने गुलाल उधळत सभापतिपदी भाजपचे केशवराव मानकर तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश भक्तवर्ती विजयी झाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीची १८ संचालक पदासाठी निवडणूक २८ एप्रिल रोजी झाली होती. यात भाजपचे ९ उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे बाजार समितीवर भाजप-राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन होणार, असे बोलले जात होते. काही संधिसाधू लोकांनी हे समीकरण बिघडविण्याचे प्रयत्न केले, पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत

सभापती व उपसभापतिपदावर भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. बुधवारी बाजार समिती सभागृहात सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी भाजप-राकाँ युतीचे केशवराव मानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेसकडून हुकूम बोहरे यांनी अर्ज दाखल केला.

उपसभापतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश भक्तवर्ती यांनी अर्ज दाखल केला तर काँग्रेसकडून बंशीधर अग्रवाल यांनी अर्ज दाखल केला. यात भाजप-राकाँ युतीच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या उमेदवाराला प्रत्येकी १४ १४ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भाजपचे केशवराव मानकर यांना सभापतिपदी व उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश भक्तवर्ती यांना विजयी घोषित केले गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक

सभापती, उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून आमगावचे तहसीलदार रमेश कुंभरे तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गुप्ता यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी माजी आ. भेरसींग नागपुरे, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, तालुका अध्यक्ष काशीराम हुकरे, सुरेश हर्षे, रवी क्षीरसागर, महामंत्री नरेंद्र वाजपेयी, राजू पटले, राकेश शेंडे, पं.स. सभापती राजेंद्र गौतम उपस्थित होते.