हिंगणघाट उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यलयाकडून माहिती अधिकारात 15 रुपये प्रत

Breaking News

हिंगणघाट उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यलयाकडून माहिती अधिकारात 15 रुपये प्रत

प्रतिनिधी:वर्धा ब्यूरो
हिंगणघाट :- हिंगणघाट उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सचिन वाघे यांनी दी.12 आक्टोबर 2022 ला जण माहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता,30 दिवसाच्या आत जण माहीती अधिकारी यांनी माहिती दिली नाही त्यामुळे प्रथम अपीलअधिकारी यांच्याकडे दि.14.नोव्हेंबर 2022 मध्ये अपील केली होती त्या नंतर जवळ पास
7 महिन्या नंतर दिनांक 2.मे .2023 ला सुनावणी घेतली त्या मध्ये अपिलार्थी सचिन वाघे यांनी सांगितले की मला आपल्या कार्यलय कडुन कोणतीही माहिती दिली नाही तसेच मी माहिती व्यक्तिश मागितली असल्यामुळे मला फोनवर माहिती देणे आवश्यक आहे.अपील अधिकारी प्रसन्न भुजाडे स्वतः उपस्थित नसल्यामुळे मी लिखित मध्ये माहिती दिली. त्या नंतर दी 23 मे 2023 ला पोस्टद्वारे माहिती पाठविण्यात आली त्यामध्ये
जनमाहीती अधिकारी यांचा युक्तीवाद :- जनमाहीती अधिकारी तथा मुख्यालय सहायक यांनी सुनावणी दि.2 मे 2023 ला हजर होवून असे कथन केले की, अपीलार्थी यांना ईकडील कार्यालयाचे पत्राव्दारे माहीती प्राप्त करुन घेणेकामी कळविण्यात आलेले आहे. अपीलार्थी यांना हिंगणघाट शहर व हिंगणघाट नझुल मधील दिनांक 1 जानेवारी 2022 ते 12 आक्टोम्बर 2022 पावेतो क्रमवारीनुसार फेरफार पंजीची मागणी केलेली होती. त्यानुसार अपीलार्थी यांना सदर फेरफार हे ऑनलाईन स्वरुपात असुन आपणास आवश्यक असल्यास प्रति फेरफार झेरॉक्स अथवा प्रमाणित प्रतीसाठी रु. 15 रुपये प्रमाणे रक्कम शासकीय खजीन्यात दाखल करावी लागेल असे दिनांक 17 आक्टोम्बर 2022 रोजी कळविण्यात आलेले आहे. असे सांगितले.

निष्कर्ष :- अपील अधिकारी उप अधीक्षक भूमी अभिलेख अपील अर्ज विना कार्यवाही खारीज केला.अपीलार्थी सचिन व्यंकटेश वाघे यांनी दि. 12 आक्टोम्बर 2022 रोजी केलेल्या अर्ज नुसार दिनांक 1 जानेवारी ते 12 आक्टोम्बर 2022 पावतो क्रमवारीनुसार फेरफार पंजीची मागणी केलेली होती. त्यावर जनमाहीती अधिकारी तथा मुख्यालय सहायक उप अधीक्षक भूमि अभिलेख हिंगणघाट यांनी माहीती प्राप्त करुन घेणेकामी दिनांक 17.आक्टोबर .2022 रोजी पत्राने कळविण्यात आलेले आहे. परंतु अपीलार्थी हे माहीती प्राप्त करुन घेणेसाठी कार्यालयात आलेले नाही व त्यांनी शासकीय नक्कल फी 15 रुपये चा सुध्दा भरणा केलेला नाही. त्यामुळे अपीलार्थी यांचा अपील अर्ज विनाकार्यवाही निकाली करणे योग्य राहील या निर्णयाप्रत हे न्यायपिठ आलेले आहे.