परिस्थिती वर संघर्ष करीत विज्ञान शाखेत जिल्ह्यातून आली पहिली, कु. केतकी शिंगोटे

Breaking News शिक्षा हिंगनघाट

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- डॉ मुजुमदार वॉर्ड येथील अरुणा शिंगोटे ( वकील) यांची मुलगी कु केतकी शिंगोटे हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत 12 वी विज्ञान शाखेत 94.50% वर्धा जिल्ह्यातून प्रथम आली । यात तिची जिद्द जेव्हडी महत्वाची आहे त्याच प्रमाणे तिच्या आईचा संघर्ष खूप मोठा आहे । लहान असताना वडिलांचे निधन झाले आईवर दोन्ही मुलींची जबाबदारी आली परंतु मुलींची जिद्द बघून आईचा अतुलनीय संघर्ष शेवटी सार्थक ठरला।।
केतकी चे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे । सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे तेव्हा तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा.