पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांचे अध्यक्षेत आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक संपन्न

Breaking News

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगाव (गोदिया)

आगामी काळात साजरे करण्यात येणारे सण – उत्सव शांततेत व निर्विघ्नपने पार पाडण्या साठी तसेच सण – उत्सव काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दिनांक – 06/09/2023 रोजी दुपारी 12.30 ते 13.30 वाजता दरम्यान जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया येथील हॉलमध्ये पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे, यांचे अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात येवून शांततेत बैठक संपन्न झाली. सदर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये आगामी काळात गणेश उत्सव व ईद- ए- मिलाद यासारखे महत्त्वाचे हिंदू- मुस्लिम समाज बांधवांचे सण साजरे होणार असून त्या अनुषंगाने सदरचे सण उत्सव अतिशय उत्साही वातावरणात, निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. आगामी सण उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्या चे अनुषंगाने पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांनी आपले अध्यक्षीय भाषणात संबोधन केले की, गोंदियाची स्वतःची ओळख शांतताप्रिय सर्वधर्म सहिष्णुता तसेच समाजामधील एकमेकांचे प्रती आदर व भाईचारा अशी आहे. अशी ही गौरवशाली परंपरा जपण्यासाठी शांतता कमेटीने पुढे येवून हातभार लावावा. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अफवा सोशल माध्यमामुळे पसरणार नाहीत यासाठी विशेष प्रयत्न शांतता समीतीकडुन झाले पाहिजे. आगामी सण उत्सव कोणत्याही विघ्न अडथळयाशिवाय निर्विघ्न शांततेत व उत्साहात साजरे व्हावे, याकरीता पोलीस प्रशासन सज्ज झाले असून *”सदरक्षणाय खलनिग्रहणाय”* या स्वतःचे ध्येयाचे तंतोतत पालन करेल अशी माहिती बैठकीमध्ये उपस्थितांना देण्यात आली. *खालील मुद्याचे अनुषंगाने बैठकीत एकमताने ठरविण्यात आले➖*▪️- सण उत्सव दरम्यान आवाजाची मर्यादा भंग करणा-या कर्ण- कर्कश वादय वाजविणारे, डी. जे. यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले आहे. ▪️- मिरवणुकी दरम्यान सामान्य नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, याकरीता मंडळाचे पदाधिकारी यांनी ठरलेल्या नियमाप्रमाणे नियोजन करावे. ▪️- मंडप रस्त्यावर उभारल्यामुळे सार्वजनीक वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.▪️- जिल्हयातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना जिल्हास्तरीय बक्षीस देण्यात येणार असल्याबाबत शासनाचे निर्णयाबाबत सांगन्यात आले.▪️ – गणपती विसर्जन मिरवणुक तसेच ईद- ए- मिलादुन्नबी जुलुस च्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे, ▪️- प्रत्येक मोठया मंडळाने 3 ते 4 खाजगी सुरक्षारक्षक नेमावेत. अश्या मुद्यावर चर्चा करण्यात येऊन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. *त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन, नगर परीषद व तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त उपक्रमातुन गणेश उत्सवानिमीत्त परवानगी साठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याबाबत बैठकीत सांगण्यात आले.*➖ *शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी पुढील बाबीवर चर्चा करून उपाययोजना करण्या बाबत विनंती केली असून उपाययोजना करण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आले .➖* ➖ उत्सवा दरम्यान अखंडीत विज पुरवठा करण्यात यावा, ➖रस्त्यावरील मोकाट फिरणा-या जनावरांची व्यवस्था करावी, ➖ शासकिय गटार योजने अंतर्गत रस्त्यावर झालेल्या खोद कामाचे पुनरबांधणी करण्यात यावी, ➖डान्स- ड्रिक डी.जे. वर बंदी असावी अशाप्रकारच्या मागण्या बैठकीस उपस्थित सुजान, प्रतिष्ठीत नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी सदस्य यांनी केले. प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले. सदर बैठकीस श्री. विशाल सोनवाने, अपर तहसीलदार,गोंदिया, श्री. करण चव्हाण, मुख्याधिकारी, नगर परीषद गोंदिया, श्री. टेंभेकर, अति. कार्यकारी अभियंता, म.रा. वि.म. गोंदिया, श्री चंद्रकांत सुर्यवंशी,पोलीस निरीक्षक, गोंदिया शहर, श्री संदेश केजळे, पोलीस निरीक्षक, रामनगर, श्री. पुरुषोत्तम अहेरकर,पोलीस निरीक्षक, रावनवाडी, इत्यादी वरीष्ठ अधिकारी प्रामुख्याने हजर होते. त्याचप्रमाणे शांतता बैठकी करीता गोंदिया उपविभागातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठीत सुजान नागरिक, शांतता समीतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.