दि. ८ सप्टेबर २०२३ ला अटल बिहारी वाजपेई,तालुका क्रिडासंकूल विसापूर बल्लारपूर येथे चंद्रपूर जि. आष्टेडु मर्दानी आखाडा व बल्लारपूर आष्टेडु मर्दानी आखाडा यांच्या वतीने ३ री चंद्रपूर जिल्हास्तरीय आष्टेडु मर्दानी आखाडा व राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा - २०२३ चे आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धेत वरोरा येथिल फौजी वाॕरिअर्स मार्शल आर्टस् च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे . सानिया आवारी , पद्मश्री झुरडे , हर्षाली कपूर , वेदीका भोयर , रितिक धवणे , वेदांत अतकाळे , शंतनू धवणे , उज्वल रंदये , पियुष विंधाणे , संस्कार पोलसेट्टीवार , यश नरडे , सोनु निकोडे , शोन दसुडे , फकिरा निखाडे या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे .
हे सर्व विद्यार्थी गुरु राजू नकवे , प्रविण चिमुरकर , डी. एन. खापने , रवी चरुरकर , रविंद्र तुरानकर यांच्या मार्गदर्शनात सदभावना चौक वरोरा येथिल राष्ट्रमाता इंदीरा गांधी प्राथमिक शाळेच्या पटांगणात कसून सराव करत आहेत . विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता कराटे , किक बाॕक्सिंग , यांगता कुंग्फू , आत्मरक्षण लाठी , तलवार , नाॕनचाॕक , दानपट्टा तसेच शारीरिक व बौद्धिक विकास योगाचे प्रशिक्षण येथे दिले जाते . राज्यस्तरासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे .