आमगाव कृ.उ.बा.स. चे सभापती /उपसभापती यांची उद्या निवडणूक

अन्य

 

उपसभापती कोण होणार, राष्ट्रवादी ठरवणार

 

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)

 

 

आमगाव स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिल २०२३ रोजी पार पडली, त्यात भाजप-राष्ट्रवादी आघाडीचे १४ संचालक आणि भाजप-काँग्रेस आघाडीचे ०४ संचालक विजयी झाले.

उद्या सभापती /उपसभापतीची निवडणूक होत आहे. प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी – आर, एस, कुंभारे यांनी संचालकांना दिलेल्या पत्रानुसार, ता.२४ मे २०२३ रोजी दुपारी १२.३० ते १.०० वाजेपर्यंत सभापती/उपसभापती यांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. स्क्रूटनी दुपारी १.१५ पर्यंत, वैध नामनिर्देशन पत्र दुपारी १.३० वाजता प्रसिद्ध, दुपारी १.४५ पर्यंत नामनिर्देशनपत्रे माघारी, २.०५ पर्यंत अंतिम प्रसिद्धी, दुपारी २.०५ ते २.३५ या वेळेत आवश्यकता भासल्यास निवडणूक होणार. आणि त्यानंतर मतमोजणी होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या अध्यक्षपदासाठी विद्यमान गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तथा माजी विधान परिषद सदस्य केशवराव मानकर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. आणि उपसभापतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही उमेदवार निश्चित झालेला नाही. आज दिवसभर बैठक झाली असून अजून उपसभापति कोण होणार स्पष्ट झाले नाही.असे म्हणतात की जेव्हा भाजप-राष्ट्रवादीची युती झाली, त्यानंतर भाजपचे सभापतीपदी केशवराव मानकर यांची तर राष्ट्रवादीच्या बाजूने टिकाराम मेंढे यांना उपसभापतिपदी बसविण्याचा निर्णय झाला. मात्र निवडणुकीत भाजपचे ०९ आणि राष्ट्रवादीचे ०५ सदस्य निवडून आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपसभापती निवडीवरून राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. टिकाराम मेंढे हे गेल्या वेळी सभापती झाल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आता इतरांना संधी द्यावी. बातमी लिहिपर्यंत आता राष्ट्रवादी काँग्रेस उपसभापतीपदी कोणाला संधी देणार त्याकडे नागरिकांचे लक्ष्य वेधले आहे.