ए.आय.एम.आय.एम ची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

नावेद पठाण मुख्य संपादक
“नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार” — आसिफ खान
वर्धा : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) वर्धा जिल्हा तर्फे आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भातील जिल्हास्तरीय आढावा बैठक वर्धा येथील विश्रामगृहात उत्साहात पार पडली.
या बैठकीचे आयोजन जिल्हा प्रभारी व वर्धा शहराध्यक्ष आसिफ खान यांनी जिल्हाध्यक्ष सल्लू शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली केले होते.
बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी, प्रदेश महासचिव समीर साजिद, जिल्हा निरीक्षक निसार अहमद,माजी विदर्भ अध्यक्ष शाहिद रंगूनवाला आणि विदर्भ नेते कृष्णा जाधव उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांमध्ये ए.आय.एम.आय.एम पक्ष सर्व जागांवर स्वबळावर लढणार असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करणे, निवडणूक रणनीती आखणे तसेच जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न आणि नगरपालिकेच्या पातळीवरील समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आसिफ खान यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी तात्काळ तयारीला लागावे आणि जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवावी.”
या बैठकीला जिल्हाध्यक्ष सल्लूभाऊ शेख, शहराध्यक्ष आसिफ खान यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.