महाकाली मंदिरात दहशतवादी हल्ल्याविषयी पोलीसांचे रंगित तालीम

Sun 25-May-2025,09:59 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : माता महाकाली मंदीर मध्ये चार दहशतवादी प्रवेश करुन दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शस्त्रांचा धाक दाखवून ओलीस ठेवतात मग चंद्रपूर जिल्हा पोलीस त्यांच्यावर कारवाई करून नागरिकांची सुखरूप सुटका करतात. हे सर्व चंद्रपूर पोलिसांची दहशतवादी हल्ला प्रसंगी करावयाची कारवाई ची रंगीत तालीम असते.भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास व ओलीस नागरीकांची सुटका कशी करावी याबाबत दिनांक २४ मे २०२५ रोजी चंद्रपूर येथील आराध्य दैवत श्री माता महाकाली मंदीर परिसरात जिल्हा पोलीस प्रशासना तर्फे पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. यांचे मार्गदर्शनात रंगीत तालीम ची प्रात्यक्षिक घेण्यात आले.२४ मे २०२५ चे दुपारी २ वाजता चंद्रपूर येथील माता महाकाली मंदीर परीसरात चार दहशतवादी अचानकपणे प्रवेश करून दर्शनासाठी आलेल्या भावीकांना शस्त्राचा धाक दाखवुन ओलीस ठेवले आहे.अशी माहिती मंदीर परीसरातुन २. ४० वाजताच्या दरम्यान पोलीस कंट्रोलरूम येथे मिळाल्यावर योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक ज़िवीशा तथा प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह) यांनी कंट्रोलरूम येथुन वरिष्ठांशी योग्य समन्वय साधुन सर्व पथके तात्काळ सर्व पथक ज्या मध्ये दहशतवाद विरोधी शाखा (ATB), जलद प्रतिसाद कमांडो पथक (QRT), दंगा नियंत्रण पथक (RCP), बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक (K9), नक्षल सेल तथा नक्षल विरोधी अभियान पथक (C-60), सुरक्षा शाखा, पो. स्टे, चंद्रपुर शहर व रामनगर, स्थानिक गुन्हे शाखा येथील विविध पोलीस पथक, वाहतूक नियंत्रण पोलीस पथक, राज्य गुप्तवार्ता विभाग चे अधिकारी, अंमलदार, पोलीस रुग्णालय वैद्यकीय चमु वाहनासह घटनास्थळी हजर झाले.वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचेसह उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर सुधाकर यादव हे तात्काळ घटनास्थळी हजर होऊन अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांनी घटनास्थळाची सुत्रे हातात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित सर्व पोलीस पथकांनी योग्य खबरदारी बाळगून कोणत्याही प्रकारची जीवहानी होऊ न देता मंदीर परिसरात शिरलेल्या दहशतवाद्यांचा यशस्वी रित्या खात्मा करून त्यांच्या ताब्यातील ओलीस असलेल्या नागरीकांची सुखरूप सुटका करण्याची कारवाईचे प्रात्यक्षिक पुर्ण केले.सदर प्रात्यक्षिक वेळी मंदीर परिसरात व शहरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेवून पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सदर प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर सुधाकर यादव यांचे नेतृत्वात प्रमोद चौगुले, परि. पोलीस उपअधीक्षक, प्रवीण कुमार पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, प्रभावती एकुरके, पोलीस निरीक्षक चंद्रपूर शहर, धर्मेंद्र मडावी, सहा. पोलीस निरीक्षक C-60, प्रवीण सोनोने, सहा. पोलीस निरीक्षक वाहतूक, शिरभाते पोलीस उपनिरीक्षक Security Branch, खोंडे, पोलीस उपनिरीक्षक BDDS, भोयर,पोलीस उपनिरीक्षक ATB, पोलीस वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरेशी तसेच पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर व रामनगर येथील आणि विविध शाखा / विभाग चे अधिकारी व अंमलदार यांनी मोलाची कामगिरी केली आहे.