न्यायाधीश अनुपम शर्मा यांना बार असोसिएशन बल्लारपूरतर्फे भावपूर्ण निरोप

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बार असोसिएशन बल्लारपूरतर्फे सिव्हिल जज ज्युनिअर डिव्हिजन व न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग अनुपम शर्मा यांचा गौरव व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशन बल्लारपूरचे अध्यक्ष ॲड आय. ए. सय्यद होते. या प्रसंगी ॲड किशोर पुसलवार, ॲड संजय बुराडे, ॲड विकास गेडाम, ज्येष्ठ वकील ॲड झेड. के. खान, ॲड रमेश उपाध्याय, ॲड राजेश सिंह, ॲड मेघा भाले, सहायक सरकारी वकील अँड सुधाकर डेगावर, ॲड सुनील पूरी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिवक्ता व सदस्य उपस्थित होते.
समारंभात न्या. शर्मा यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन ॲड. नझीम खान यांनी केले.उपस्थित अधिवक्त्यांनी आपले विचार व्यक्त करताना न्या.शर्मा यांच्या कार्यकाळातील न्यायनिष्ठ कार्यप्रणालीचे कौतुक केले.
समारोपाच्या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना न्या. शर्मा यांनी बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानले व येथे व्यतीत केलेला काळ सदैव अविस्मरणीय राहील,असे सांगितले.