गरीब कुटुंबातील युवक केतन अनिल हिंगे याचीइंडीयन आर्मी अग्निविर मध्ये निवड
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर
अल्लीपुर:घरची परिस्थिती हालाखीची असतानाही परिस्थितीला न डगमगता कठीण परिश्रम करून भारतीय सैन्य दलात जनरल ड्युटी (जिडी)मध्ये निवड झाली असुन अल्लिपूर गावकऱ्यांसाठी गौरवाची बाब आहे.
केतन अनिल हिंगे अल्लिपूर असे या कर्तबगार युवकाचे नाव आहे आई वडील दोघेही रोजमजुरी करुन परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते याही परिस्थितीत केतनने अभ्यासातील सातत्य कायम ठेवले त्याच परिस्थितीवर अवलंबून न राहता ती परिस्थिती बदलविण्याकरीता त्याने कठोर परिश्रम घेतले.
यातूनच त्याला यश प्राप्त झाल्याने त्याची भारतीय सैन्य दलात इंडीयन आर्मी मध्ये निवड झाली आहे. गावातील वाचनालयात तो गेल्या तीन चार वर्षापासून सतत अभ्यास करत होता त्याला वाचनालयातील पवन भोयर , विशाल सुरकार यांचे मार्गदर्शन मिळाले फावल्या वेळात तो खुल्या मैदानात शारीरिक चाचणीचा सराव करायचा यातूनच त्याने यश प्राप्त केले त्याने त्याच्या यशाचे श्रेय आई वडील आजोबा आजींना दीले आहे त्याच्या या निवडीबद्दल त्याच्या मित्र मंडळींनी व गावाच्या वतीने जल्लोषात स्वागत व सत्कार करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ऋषिकेश कलोडे , माजी सरपंच नितीन चांडणखेडे , पत्रकार सुनिल हिंगे , मंगेश शेंडे , राहुल शेंडे, कुणाल कलोडे , गौरव चांडणखेडे व वाचनालयातील मित्र मंडळी उपस्थित होते.