महिला काँग्रेस तर्फे रंगताली गरबा महोत्सव चे आयोजन

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर शहर व तालुका महिला काँग्रेसतर्फे २४ व २५ सप्टेंबर रोजी महिला महाविद्यालयाच्या पटांगणात, संत तुकाराम हॉल समोर रंगताली गरबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होईल.
कार्यक्रमात महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरबा स्पर्धा रंगणार आहेत. विशेष म्हणजे, गरबा-दांडियामध्ये सहभागी होणाऱ्या विजेत्यांसाठी बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्पर्धा दुहेरी, वय ६ ते १३ वर्षे, विवाहित महिला आणि ग्रुप अशा विविध श्रेणीत होणार आहेत.
डॉ. रजनी हजारे (माजी नगराध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी), ॲड.मेघा भाले (शहराध्यक्ष महिला काँग्रेस), अफसाना सय्यद (तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस), छाया मडावी, रजनी मुलचंदानी, सुनंदा आत्राम (सर्व माजी नगराध्यक्ष) तसेच सुनंदा ढोबे,इंदु राजूरकर,पिंकू हरडे, बबिता बहूरिया, कल्पना कोलांडे,छाया शेंडे, वनिता तारा,भारती ठाकुर तसेच महिला काँग्रेस च्या पदाधिकारी यांनी नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.