पुर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 चा 45 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

Fri 03-Oct-2025,08:14 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:-अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथील सभासदांच्या सहकार्याने पूर्णा कारखाना भविष्यात सी.बी.जी. सी.एन.जी.प्रकल्प उभारणार असल्याची ग्वाही पुरणाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे तर गाळप क्षमता वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मत आ. राजु नवघरे यांनी व्यक्त केले आहे

पुर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 चा 45 वा " बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ " कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांचे अध्यक्षतेखाली व आ. चंद्रकांत (राजुभैय्या) नवघरे, संचालक पुर्णा स.सा.का. यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

कारखान्याचे सन्मा. संचालक गजानन रामराव सवंडकर व त्यांच्या सुविद्य पत्नी.राधिका सवंडकर व संचालक विश्वनाथ साहेबराव फेगडे व त्यांच्या सुविद्य पत्नी.सुमित्रा फेगडे तसेच संचालक ज्ञानोबा महादजी वंजे व त्यांच्या सुविद्या पत्नी. भागीरथी वंजे या उभयंतांचे शुभहस्ते 45 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला.या वेळी आ.राजुभैय्या नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वांना दशहराच्या शुभेच्छा देऊन कारखान्याची गाळप क्षमतेत वाढ करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांनी मार्गदर्शन करतांना कारखान्याचे सन्मा. सभासदांनी कारखान्याचे गाळपाचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी सभासदांनी आपला ऊस आपल्याच पुर्णा कारखान्याला द्यावा असे आवाहन केले. भविष्यात कारखाना साईटवर सी.बी.जी. सी.एन.जी.प्रकल्प उभारण्यात येणार असून डिस्टीलरी प्रकल्पास मल्टीफिड डिस्टीलरी करणार असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे कारखान्याची गाळप क्षमता वाढवुन सभासद शेतकऱ्यांचा वेळेत ऊस गाळपास आणला जाईल असे नमुद केले.सदर कार्यक्रमास माजी आमदार पंडीतराव देशमुख, सुभाष लालपोतु, बालासाहेब महागांवकर, रामचंद्र बागल, डॉ.डि.बी. पार्डीकर, कारखान्याचे सर्व संचालक, परिसरातील सभासद, शेतकरी बंधु, तोड वाहतुक ठेकेदार, कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन कारखान्याचे शेती व ऊसविकास उपसमिती अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.