संपर्कप्रमुख सिताराम भुते यांच्या हस्ते कोरा सर्कल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून बांधले शिवबंधन

प्रतिनिधी : विलास लभाने गिरड
आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणी व बळकट करण्याच्या अनुषंगाने पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशनानुसार कोरा सर्कल मधील पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. रमेश जाधव, जिल्हा सह संपर्क प्रमुख सीताराम भुते यांच्या मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर चामचोर यांचा नेतृत्वात समुद्रपुर तालुक्यात गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने कोरा जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी विलासराव तिमांडे यांची निवड करण्यात आली. तर मंगरूळ पंचायत समिती सर्कल प्रमुख किशोर दडमल यांना निवड पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर मंगरूळ येथील शाखा प्रमुख संजय भोयर, उप शाखा प्रमुख शंकर झाडे, राजू हिरामण कुबडे, मोहन कुबडे, प्रफुल जीवतोडे,विष्णू पडावे, अमोल कुबडे यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे लक्ष्मण भोयर, राकेश चंदनखेडे, राजेराम भिसेकर, हमिद पटेल, संजय बोरकर, कुंडलिक सहारे,दीपक टोहकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणी करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.