*मदारी गारोडी समाजाच्या विविध समस्यांवर खासदार अमर काळे यांच्यासोबत बैठक*

नावेद पठाण वर्धा
वर्धा (दि. २४ सप्टेंबर २०२५) मदारी गारोडी भटके जमाती सेवा समितीच्या वतीने आज वर्धा लोकसभा खासदार अमर काळे यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मदारी समाजाच्या महत्त्वाच्या समस्या मांडण्यात आल्या. त्यात मदारी वस्तीचे पुनर्वसन, जात प्रमाणपत्र, पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांचा समावेश होता.
बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष जब्बार, प्रदेश सदस्य रहीम, प्रदेश सदस्य रमजान, विदर्भ उपाध्यक्ष नजरोद्दीन, विदर्भ सचिव जावेद, वर्धा जिल्हा अध्यक्ष कादीर, जिल्हा सचिव नजीर, जिल्हा संपर्क अध्यक्ष किम, जिल्हा कोषाध्यक्ष इग्बाल, जिल्हा सल्लागार सादिक तसेच जिल्हा सदस्य मुकद्दर, रजिक आणि अब्जल आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार अमर काळे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आणि पुलगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदारी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.
या उपक्रमाबद्दल विदर्भ अध्यक्ष शाहरुख अली सय्यद यांनी खासदार अमर काळे यांचे आभार मानले.