एकलव्य ग्रंथालय येथे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी: भारताचे अकरावे राष्ट्रपती व थोर वैज्ञानिक, भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्याने एकलव्य ग्रंथालय येथे प्रेरणा वाचन दिन म्हणून साजरा करण्यात आला, जयंतीनिमित्त अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेची पूजा करून उपस्थितांनी माल्यार्पण केले. या जयंती निमित्ताने बोलतांना सामाजिक कार्यकर्ते दौलत कुथे म्हणाले की, राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम देशात आधुनिक वैज्ञानिक विकासात पाऊल टाकण्यात मोठा सिंहाचा वाटा असून यांच्यासारखा थोर महान वैज्ञानिक होणे कठीण अध्यक्य प्राय आहे केवळ यांच्या मुळेच देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे. त्यामुळे त्यांच्या गुणांचा अवलोकिक विचार आत्मसात घेऊन भविष्यातील पिढीने वाटचाल करावी जेणेकरून असे कमी अधिक कलाम तयार होतील असे यावेळी कुथे यांनी म्हटले.यावेळी जयंती कार्यक्रमांमध्ये एकलव्य ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश रेहपाडे, सामाजिक कार्यकर्ते दौलत कुथे , महादेव कोपूलवार, प्रमोद शेंडे, तृष्णा हिरापुरे , प्राध्यापक अशोक भेंडारकर, गोविंदा बोळणे , सत्यवान वाघाडे, दिंगाबर कार इत्यादी सदस्य व नागरिक उपस्थित होते.