वि.क्षे.तां.का.संघटनेचे वतीने निरोप समारंभ आयोजित

Sat 14-Jun-2025,02:05 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी:विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सर्कल शाखा गडचिरोली च्या वतिने आज दि. १३/६/२०२५ रोजी स्थानिक तांत्रिक कर्म. पतसंस्था कार्यालयात, म. रा. वि वि. कं. गडचिरोली विभागाचे . उपव्यवस्थापक (मांस)तथा गडचिरोली सर्कल चे प्रभारी व्यवस्थापक(मांस) योगेश गोरे यांचे स्थानांतरण गोंदिया झोन मधे झाल्याने त्यांचा शाल. श्रीफळ, व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संघटनेचे प्रादेशिक सहसचिव, युवराज कोडापे,तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा प्रति.एम.जी. चिचघरे,पतसंस्था अध्यक्ष गजानन कोहळे, पतसंस्था सचिव कृष्णा ईन्कणे, सर्कल संघटक सुनील पाकलवार ,सर्कल उपाध्यक्ष सुधीर चौधरी,उपस्थित होते, यावेळी योगेश गोरे यांचा कार्याचा,यथोचित गौरव करून तांत्रिक कर्मचार्यांकडुन निरोप देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सर्कल सचिव नितीन सोनकुसरे,यांनी केले.आभार विभागीय सचिव निकेश धकाते यांनी मानले,कार्यक्रमाला संघटनेचे सर्कल तथा विभागिय पदाधिकारी व सभासद आवर्जून उपस्थित होते.