२०० किलो चोर बीटी बियाणे जप्त गोंडपिपरी पोलिसांची कारवाई

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर:गोंडपिपरी पोलीसांनी गोपनीय माहिती च्या आधारे छापा टाकून २०० किलो किंमत ३ लाख रुपये जप्त केले. सदर कारवाई १० जुन रोजी करण्यात आली.१० जुन रोजी गोंडपिपरी पोलीसांना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, अरविंद तुळशीराम जुनारकर (३४) रा. शिवणी, याने शिवाजी चौक, गोंडपिपरी येथे शासनाने प्रतिबंधित केलेली कापुस (चोर बिटी) बियाणे विक्री करिता आणले आहे अशा माहितीवरून सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पंच व सोबत कृषी अधिकारी यांना घेऊन रेड कारवाई केली असता वरील इसमाच्या ताब्यात २०० किलो चोर बिटी बियाणे किंमत अंदाजे ३ लाख रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याचेवर बियाणे अधिनियम व इतर कलमान्ये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उप विभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनात ठाणेदार रमेश हत्तीगोटे, कृषी अधिकारी सचिन पानसरे, सफौ कोसमशिले, पोअं प्रशांत नैताम, सचिन गायकवाड यांनी केली आहे.