भारत स्पोर्ट्स अकॅडमी आरमोरीच्या खेडाळुंची राज्यस्तरावर झेप

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी :- महाराष्ट्र असोसिएशन च्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन द्वारा येथे राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेकरिता जिल्हा निवड चाचणी ८ जून २०२५ रविवार ला सी.आर.पी.एफ. कॅम्प जवळील एम. आय. डी. सी.च्या मैदानावर पार पडली महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २१ जून ते २३ जून २०२५ दरम्यान पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी,पुणे येथे आयोजित केल्या जाणार आहेत.त्याकरिता या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता गडचिरोली जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने वरिष्ठ गट महिला/पुरुष यांच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते या निवड चाचणी स्पर्धेत भारत स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यार्थिनी कुमारी.श्रेया दिलीप शेबे हीने गोळाफेक ,२०० मीटर रनिंग व ४×४०० रीले स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत प्रथम क्रमांक पटकावला तर कुमारी . नूतन सचिन चौके हीने ८०० मिटर रणींग स्पर्धेत दुतीय क्रमांक पटकाविला तर ४×४०० रीले स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत प्रथम क्रमांक पटकावला विजेत्या खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय आईवडिलांना, पालक तथा भारत स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक महेंद्र मने सर यांना दिले.