व्यक्तिमत्व विकास शिबिराची समाजाला गरज : मोहनबाबू अग्रवाल,14 दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न

Mon 04-May-2026,03:55 AM IST -07:00
Beach Activities

व्यक्तिमत्व विकास शिबिराची समाजाला गरज : मोहनबाबू अग्रवाल

14 दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न 

 

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा वर्धा आजच्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्व विकास शिबिरांची समाजाला, विशेषतः तरुण पिढीला, नितांत गरज आहे. अशी शिबिरे केवळ व्यक्तिमत्व घडवत नाहीत, तर जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद देतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल यांनी केले.

ते दि. 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता रामनगर येथील सर्व सेवा संघाच्या मैदानावर स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे संचालित स्पोर्ट कराटे असोसिएशन, वर्धा जिल्हा यांच्या वतीने आयोजित 14 दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महिला व बालकल्याण सभापती तथा वर्धा नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका वंदना भुते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही, अध्यक्ष सतीश इखार, उपाध्यक्ष मोहन मोहिते, सचिव व शिबिराचे मुख्य मार्गदर्शक शिहान मंगेश भोंगाडे, गॅरेंटी इंग्लिश स्पिकिंगचे संचालक श्याम पठवा, विश्वसिंधी सेवा संगमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानदास आऊजा, निखिल सातपुते, प्रवीण पेठे, योग शिक्षिका हेमलता काळबांडे, ऊशू स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश राऊत, कोषाध्यक्ष सौ. मनीषा राऊत, तसेच डान्स व चित्रकलेचे प्रशिक्षक संदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजाला सकारात्मक, हुशार व प्रगल्भ पिढी घडवण्यासाठी अशा शिबिरांची गरज असल्याचे मत इमरान राही यांनी व्यक्त केले. तरुणांमधील भीती व संकोच दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, तसेच नेतृत्वगुण व संघभावना विकसित करणे हे शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नगरसेविका वंदना भुते यांनी सांगितले. यावेळी मोहन मोहिते, सतीश इखार व मंगेश भोंगाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

शिबिराचे आयोजन रामनगर शाखाप्रमुख तथा कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय पंच सेन्साई पूजा गोसटकर यांनी केले. प्रस्तावना पालक प्रतिनिधी सौ. हेमाताई राठोड यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू सेन्साई पियूष हावलदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सीनियर खेळाडू सेन्साई शुभम राखडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्तिक भगत, आकाश कच्छवाह, ऋषभ चावरे, भार्गव खेवले, देवांशी लाखे, पियूष सिंग, रुजान बांगमोरे आदींनी अथक परिश्रम घेतले.