गडचिरोली येथे राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेकरिता जिल्हा निवड चाचणी 7 व 8 जून

Tue 27-May-2025,01:04 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली 

गडचिरोली :-  येथे राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेकरिता जिल्हा निवड चाचणी ७ व ८ जून २०२५ ला सी.आर.पी.एफ. कॅम्प जवळील एम. आय. डी. सी.च्या मैदानावर होणार आहे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २१ जून ते २३ जून २०२५  दरम्यान पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल,पुणे येथे आयोजित केल्या जाणार आहेत. त्याकरिता या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता गडचिरोली जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी  गडचिरोली  जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने वरिष्ठ गट महिला/पुरुष यांच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेसाठी ज्या  खेळाडूंना सहभागी व्हायचे असेल त्यांनी  ६ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत जिल्हा संघटने द्वारा निर्मित केलेल्या ऑनलाइन लिंक च्या माध्यमातून आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.24-08-2025 रोजी १६ वर्षाखालील खेळाडूंना या स्पर्ध्येत भाग घेण्याची परवानगी नाही या स्पर्ध्येत एक खेळाडू फक्त तीन वैयक्तिक क्रीडा प्रकारात भाग घेऊ शकतो राज्यस्तरीय स्पर्ध्येकारिता प्रवेश फक्त दोन व्ययक्तीक EVENT मध्ये प्रवेश घेता येईल स्पर्ध्येकरिता धावपटूला स्वत:चा  AFI ID क्रमांक असणेअनिवार्य आहे.या स्पर्धेमधून प्रत्येक क्रीडा प्रकारातील २ विजयी महिला व पुरुष खेळाडूंची निवड  राज्यसंघटनेने दिलेल्या पात्रतेच्या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या संघात केली  जाणार आहे.स्पर्धेकरिता येताना खेळाडूंनी AFI ID क्रमांक तसेच आधार कार्ड  सोबत आणणे आवश्यक असुन या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी प्रती EVENT 300/- रुपये आणि रिले संघासाठी 600 प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले आहे.जास्तीत जास्त स्पर्धकांनी या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभाग नोंदवावा व अधिक महितीसाठी (8999195070, 8275549514) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे  सचिव आशिष नंदनवार यांनी केलेले आहे.