रुग्णमित्र गजू कुबडे यांचा असाहीं ध्येयवेडेपणा दिव्यांगाच्या हस्ते केली रुग्णवाहिका समाजार्पण

अब्दुल कदीर बख्श
वर्धा:हिंगणघाट स्वतःची इंडिगो विकून त्यांला रुग्णवाहीकेचे रूप देऊन त्या रुग्णवाहिकेचे आज 1 जूनला काही दिव्यांगाच्या हस्ते समाजासाठी अर्पण करण्यात आली.रुग्णमित्र गजू कुबडे यांनी शहरातील अत्यावश्यक रुग्णांना मदत मिळत नव्हती. हीं गरज ओळखून गजू कुबडे यानी लोकवर्गणी करून त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराने दिलेली इंडिगो वाहनाला रुग्णवाहिकेत परावर्तीत करून शहरातील गोरगरीब जनतेला सोयीचे व्हावे म्हणून आज तिचे लोकार्पण राजू पपंनवर, पिंटू कावळे, या दिव्यांगा च्या हस्ते करून एक आदर्श निर्माण केला आहे.हीं रुग्णवाहीका राष्ट्रीय महामार्गवरील अपघातग्रस्त रुग्णांना रुग्णालयापर्यन्त व रस्त्यावर बेवारस म्हणून भटकणाऱ्या मतिमंद व्यक्तींना आश्रमापर्यन्त पोहचविण्यासाठी हीं रुग्णवाहीका मोफत देण्यात येणार आहे.गजू कुबडे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.