पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्य स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्हा संघाची निवड

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली :- महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन च्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन द्वारा गडचिरोली येथे राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेकरिता जिल्हा निवड चाचणी ८ जून २०२५ रविवार ला सी.आर.पी.एफ. कॅम्प जवळील एम. आय. डी. सी.च्या मैदानावर पार पडली महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २१ जून ते २३ जून २०२५ दरम्यान पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी,पुणे येथे आयोजित केल्या जाणार आहेत. त्याकरिता या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता गडचिरोली जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने वरिष्ठ गट महिला/पुरुष यांच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते या निवड चाचणी स्पर्धेत पुरूष गटात १०० व २०० मीटर स्पर्धेत शादाब बेग ,अभिनव नैताम ,४०० मीटर दौड स्पर्धेत निशांत भुकया, कासिफ शेख ,८०० मीटर संदीप उसेंडी,१५०० मीटर अविनाश कांडो ,अतुल पुसावी,५००० मीटर यश बांदेकर, रोशन बोदलकर,१०,००० मीटर यश बांदेकर ,अविनाश कांडो , लांबउडी स्पर्धेत अभिनव नैताम तर ४१०० रीले स्पर्धेत अभिनव नैताम, दिनेश मडावी,अतुल पुसावी, देवित तलांडे, निशांत भुकया,तर ४४०० मीटर रिले स्पर्धेत अविनाश कांडो,यश बांदेकर, पीयूष सोनुले, ओमकार दरो यांची निवड झाली तर महिला गटात १०० मीटर मोनिका मडावी,२०० मीटर श्रेया शेबे,४०० मीटर जयश्री करंगामी ,नूतन चौके, ८०० मीटर वैष्णवी दते,नूतन चौके, उंचउडी मोनिका मडावी, गोळाफेक श्रेया शेब तर ४*१०० मीटर रिले करीता श्रेया शेबे, नूतन चौके , अमृता होळी, शितल गेडाम यांची निवड झाली गडचिरोली जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव आशिष नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा पार पडली या स्पर्धेला पंच म्हणून महेश वाढई सर राहुल जुआरे सर ,महेंद्र मने सर , अमोल बांगरे सर व जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.