अल्लीपूर ठाणेदारपदी विजय घुले रूजू

सुनिल हिंगे (अल्लीपूर )
हिंगणघाट तालुक्यातील अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल्ल डहुले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पुलगाव येथील विजय घुले यांना अल्लीपूर पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. गत काही दिवसांपासून अल्लीपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावामध्ये चोऱ्या, बलात्कार, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वरिष्ठांकडून दबाव वाढत होता. शिवाय राजकीय मंडळीकडून बदलीची सातत्याने मागणी होत होती. नव्याने रूजू झालेले ठाणेदार विजय घुले यांच्यासमोर अवैध रेतीतस्कर, दरोडेखोर, दारूविक्रेत्यांचे मोठे आव्हान आहे. या गैरप्रकारांना रोखण्यात ते कितपत यशस्वी होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
Related News
सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी याचे पद रिक्त अवैध कामांना आले उत शासन प्रशासनाचे दुर्लक्ष
16-Aug-2025 | Sajid Pathan
ग्रामपंचायत कार्यालय काचनगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला
14-Aug-2025 | Sajid Pathan
हर घर तिरंगा अभियानांतर्गत बल्लारपूर नगर परिषदेची तिरंगा बाईक रॅली उत्साहात.
11-Aug-2025 | Sajid Pathan