छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

प्रतिनीधी रवि वाहने शेंदुर्जनाघाट
वरूड:छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सव सोहळा शेदुरजनाघाट येथे साजरा करण्यात आला या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन छावा संभाजी राजे सेना शाखा शेंदुर्जनाघाट यांच्या वतीने करण्यात आले या सोहळ्यानिमित्त जाहीर संगीतमय व्याख्यान सुप्रसिद्ध शिवशाहीर व्याख्याते अजिंक्य राहुल पाटील व त्यांचा समूह यांचे जाहीर व्याख्यान दिनांक 13/ 5 /2025 ला सायंकाळी सात वाजता गुजरी बाजार चौक शेंदुर्जनाघाट येथे आयोजन करण्यात आले होते तर सकाळी दहा वाजता हनुमान मंदिर ;गळ्याचे गोठान. शेंदुर्जना घाट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ६१ जनांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे उद्घाटन व रुग्णवाहिका चे लोकार्पण जगदीश काळे, सुभाष गोरडे, हितेश ढोरे , या मान्यवरांच्या हस्ते झाले तसेच दिनांक 14 /5/ 2025 ला सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन सुभाष गोरडे माजी नगराध्यक्ष, जय प्रकाश भोंडेकर माजी उपाध्यक्ष, गणेश सालबडेॆ, संजय दुपारे, आकाश वाघाळे, नितीन श्रीराव,रवीराज पुरी ,अमित खासबागे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या वेळी परीसरात मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी, छावा संभाजी राजे सेना पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमा करीता अंकित फुटाणे ,रोशन पुरी, चंद्रकांत रडके, निखिल सावंत, अंकुश देवते ,विशाल जयस्वाल, रवी सोनेकर ,अक्षय कुराडे ,पवन बिजवे, कृष्णा रेवत्कार यांनी अथक परिश्रम घेतले