गडचिरोली जिल्यातील बोगस अल्पसंख्यांक दर्जा,शालार्थ आयडी,अपंग प्रमाणपत्र,चौदावा आयोग अनियमितता तक्रारी संदर्भात सहपालकमंत्री यांची भेट

Fri 16-May-2025,01:29 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी - विभा बोबाटे गडचिरोली 

गडचिरोली:साईनाथ अद्दलवार ( मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी ) यांची सेवा ज्येष्ठता यादी वगळून मुख्याध्यापक पदी नियुक्ती व त्यांनी २ मे २०१२ नंतर केलेली अवैध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती यांनी ह्या शिक्षक भरती घोटाळा मधून बेकायदेशीर मार्गाने जमा केलेली संपत्ती विश्वशांती विद्यालय कुनघाडा (रै),विश्वशांती विद्यालय भेंडाळा ता.चामोर्शी येथील बोगस अल्पसंख्याक दर्जा व बोगस शालार्थ आयडी प्राप्त करून करण्यात आलेली शिक्षक भरती जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधीत शिक्षक / शिक्षिका यांचे वर कारवाई करण्यात यावी गट ग्रामपंचायत शिवराजपूर ता. देसाईगंज यांनी १४ वा वित्त आयोग योजने अंतर्गत केलेल्या कामामध्ये अनियमितता असल्यामुळे शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी चौकशी करावी.ह्या तक्रारी संदर्भात कैलास बगमारे जिल्हा सहसंयोजक भाजपा पंचायत राज व ग्राम विकास विभाग गडचिरोली यांनी महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री व गडचिरोली चे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल साहेब यांची भेट घेतली व तक्रारी संदर्भात चर्चा केली.संबंधीत तक्रारी लवकरच मार्गी लावून संबंधितावर योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी दिली