दांडेगांव येथे बुद्धरुप स्थापन

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील दांडेगांव येथे अतिशय साधेपणाने व धार्मिक वातावरणात भंते सचितबोधी यांच्या हस्ते बुद्धरुपाची बुद्धविहारात स्थापना करण्यात आली. नारथराव हनुमंते, निवृत्ती हनुमंते, रमेशराव हनुमंते, बाबुराव हनुमंते, शंकर जाधव, लालू कुऱ्हे, अशोक पाईकराव, नितीन खंदारे, राजू पाटील, नयन कांबळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्रिशरण-पंचशील आणि बुद्ध पुजापाठ करुन रितसर कार्यक्रमाची सुर्वात झाली. दांडेगांव येथील उपा.शोभा जनार्धन हनुमंते, उपा.शोभाबाई गणेशराव हनुमंते व उपा.सुशीला कदम यांनी धम्मसहल करुन आल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. नंतर उपस्थितांना प्रजाशाहीचा आवाज चे संपादक वैभव धबडगे, भिमशाहीर रामभाऊ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळेस लक्ष्मण हनुमंते, भिमराव हनुमंते, कैलास हनुमंते, राजू हनुमंते,बबनराव हनुमंते,पांडूरंग गायकवाड,संतोष हनुमंते,ग्यानोजी भालेराव,विजय हनुमंते, अमोल खंडागळे,विनोद हनुमंते, संघरत्न हनुमंते, गौतम हनुमंते इत्यादी ची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेश खाडे यांनी केले तर आभार दिनेश हनुमंते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल हनुमंते,संभाजी हनुमंते, प्रशांत हनुमंते, झोडपे, पिराजी हनुमंते इत्यादी तरुणांनी विशेष सहकार्य केले.