संबोधी बुद्ध विहार हर्ष नगर येथे आज पासून दीप प्रज्वलन करून योग वर्ग सुरू करण्यात आला

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली: वसमत हर्ष नगर वसमत येथील समस्त महिलांनी डॉ.सुनीती रवींद्र तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरातील सर्व महिलांचा संघ तयार करून त्यांनी सकाळी रोज नियमितपणे साडेपाच ते साडेसहा वाजता विहारात एकत्रित येऊन नियमितपणे योगाचा अभ्यास करण्याचा संकल्प केला त्या वर्गाचे नाव सद्धम्म योग संघ वर्ग असे ठेवण्यात आले . डॉ एन एन कुंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व योग साधना प्रतिष्ठान वसमतच्या सर्व महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी तेलगोटे मॅडमनी योगसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगशिक्षक अरविंद जाधव सर डॉ.कुंटे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले.. यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या यामध्ये सुनीता गुजराती मॅडम , शिंदे मॅडम ,तेलगोटे मॅडम डॉक्टर रविन्द्र तेलगोटे, कांबळे ताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी हर्ष नगर , फुले नगर वसमत मधिल असंख्य महिला उपस्थित होत्या.