दि.गडचिरोली नागरी सहकारी पथ संस्था मर्यादित गडचिरोली शाखा- आरमोरी 32 वा वर्धापन दिन उत्साहात संपन

जिल्हा प्रतिनिधी-विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी:आज दिनांक 30 जून 2025 ला दि. गडचिरोली नागरी सहकारी पथ संस्था मर्यादित गडचिरोली, शाखा - आरमोरी च्या वतीने संस्थेचा 32 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. मधुकर धंदरे यांनी भूषविले तर प्रमुख अस्थिती म्हणून श्री. दौलत कुथे, विजय सुपारे, विपिन राऊत, ताराचंद नागदेवे, आत्माराम डोकरमारे, बोगा, मॅडम इत्यादिनी उपस्थिती दर्शवून विद्येची देवता माता स्वरस्वती व स्वर. खुशालराव वाघरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या वर्धापन दिनाची सुरवात झाली. ज्या पतसंस्थेत समाधानी व विश्वास ग्राहकांची संख्या जितकी ज्यास्त तितकी त्या संस्थेची दीर्घकालीन प्रगती साधण्याची संधी अधिक असल्याचे अनेक मान्यवरांनी संबोधित केले. या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी "उत्कृष्ट कर्जधारक सुनिल ढोंगे आदर्श ठेवीदार आनंदराव झोडे आणि प्रामाणिक अभिकर्ता म्हणून कैलास खोब्रागडे आदींचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला." या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक ताराचंद वाघरे यांनी केले. तर सूत्र संचालन चेतन भोयर व उपस्थितचे आभार मनोज पांचलवार यांनी मानले. आणि कार्यक्रमाचे यश्ववितेसाठी नरेश नवघडे, रंजीत बनकर, आशीष चिलबुले, राकेश कापकर यांनी मोलाचे सहकार्य केले.