आपत्ती व्यवस्थापनात जिल्हाधिकाऱ्याचे निष्काळजीपणाचे धोरण

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-संपूर्ण गोंदिया जिल्हा हवामान रेड अलर्ट झोन जाहीर केलेला होता . या रेड अलर्ट झोनची चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकार्याने दखल घेऊन संबंधित जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली परंतु गोंदिया जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांनी नोंद न घेता तशी पूर्व सूचना जिल्ह्यातील शाळांना देण्यात आलेली नव्हती त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील बऱ्याच शाळेतील विद्यार्थी 26 जुलै 2025 ला शनिवार दिवस असल्याने विद्यार्थी सकाळी शाळेत पूरस्थिती असलेल्या नदी नाल्यातून वाट काढून पोहोचले परंतु काही अनर्थ घडले असते आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर अशा परिस्थितीत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापका ला याबाबत धारेवर पकडून त्याच्यावर जाब जवाब विचारल्या गेले असते दोन दिवसा अगोदर 23 जुलैला जमाकुडो येथील माजी जिल्हा परिषद सदस्याचे पुत्र मुसळधार पाऊस पडून नाल्याला पूर आल्याने वाहून गेले 24 जुलैला त्यांचे अंत्यष्टी करण्यात आली ही घटना ताजी असताना आपत्ती व्यवस्थापन चे अध्यक्ष याबाबत निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे.हवामान विभागाने 25 तारखेलाच गोंदिया जिल्हा रेड अलर्ट दाखविल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकारी याची दखल घेत नसतील तर त्यांचे सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाशी काही घेणेदेणे नाही,अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून येत आहे.25 जुलै च्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सालेकसा आमगाँव तालुक्यातील नदी नाले ओढे मुसळी भरून वाहत आहेत. ग्रामीण भागात असलेले लहान ओढे सुद्धा मुसळी भरून वाहत आहेत,यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे पूर्वसूचना न मिळाल्यास त्यांच्या जीवावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.