आजाद चे बिरसा फुले आंबेडकरी महासंमेलन

Sun 29-Jun-2025,09:23 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी : नुकताच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था व नगर परिषद,नगर पंचायत निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत दिले असून आजाद समाज पार्टीने मोर्चे बांधणी करण्याच्या उद्देशाने आरमोरी येथे बैठकीचे आयोजन केले होते.सदर बैठकीला पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम,जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रभारी हंसराज उराडे यांनी धोरणत्मक मार्गदर्शन केले.दरम्यान भारत मेश्राम यांची विधानसभा उपाध्यक्ष पदी,पौर्णिमा शेंडे यांची आरमोरी महिला आघाडी तालूका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.आरमोरी विधानसभेत फुले आंबेडकरी राजकारणाची मोठी स्पेस खाली असून ती भरून काढण्यासाठी आजाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले असून 12 जुलै रोजी पक्षाचे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आरमोरी येथे बिरसा फुले आंबेडकरी महासंमेलन आयोजित करणार व आगस्ट महिन्यात आष्टी येथे संमेलन आयोजित करुन दरम्याच्या काळात जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय मेळावे घेण्याचा ठराव यावेळी पारित करण्यात आला. त्या अनुसंघाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावा पर्यंत पोहचले पाहिजे असेही राज बन्सोड यांनी सांगितले.बैठकीला पक्षाचे जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके,प्रवक्ते प्रितेश अंबादे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, पक्षाचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषीं सहारे, गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले तालुकाध्यक्ष ॲड. नर्गिस पठाण, तालूका सचिव सुरेंद्र वासनिक, शहराध्यक्ष नितीन भोवते, शहर उपाध्यक्ष टारझन निमगडे, आरमोरी महिला आघाडी अध्यक्ष स्वाती खोब्रागडे, वडसा महिला अध्यक्ष सपना मोटघरे, आरमोरी युवा आघाडी अध्यक्ष लकी पाटील, उपाध्यक्ष पियुष वाकडे, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम आदी पदाधिकारी उपस्थित होते.