आरमोरीत प्रथमच जनता दरबार नागरिकांच्या समस्या जाणून त्वरित निवारणाचे आदेश

Sat 26-Jul-2025,03:36 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनीधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी - विधानसभा क्षेत्रात यापूर्वी कधी न झालेला जनता दरबार आमदार रामदास मसराम यांच्या पुढाकाराने विस ते पचेविस वर्षांनंतर प्रथमच आयोजित करण्यात आला.हा दरबार शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी आरमोरी तहसील सभागृहात पार पडला. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासनाच्या विविध विभागांशी संबंधित अडीअडचणी, समस्या व प्रश्न थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर मांडता यावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.तालुक्यातील दूरदूरच्या गावांतून पाऊस व काही ठिकाणी पुर असताना मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांनी जलजिवन मिशन च्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने नदिचे गढुळ पाणी गावात पाईप दारे नळाना येत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या भेडसावत आहे तसेच अनेक गावांतील पाणी पुरवठा बंद तसेच सिंचनासाठी लोडशेडींग अपुरा वीजपुरवठा, रस्त्यांची मोठ्या दुरवस्था, झाल्यामुळे अपघात होत आहेत आरोग्य सुविधा अपुरी असणे, शैक्षणिक अडचणी, अतिक्रमण वाढले सौर उर्जेसाठी डिमांड भरले परंतु कम्पनी कडुण शेतकऱ्यांना सात महिने झाले परंतु उपलब्ध झाले नाही तसेच शेतकऱ्यांना बियानेचा पुरवठा नाहीच्या बरोबर खताचा टुटवडा शेतकरी अडचणीत बिएस एन एलचा नेटवर्कर नाही सोछायलाचे अनुदान तिन वर्षांपासून प्रलंबित पिक विम्यापासुन मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित प्रल्कप ग्रस्तांना प्रमाणपत्राचे वाटप नाही नगरपरिषद क्षेत्रात दुक्षित पाणी अन्य समस्या कुसुम योजनेच्या मोटार पंप सौलरची समस्या शेतकऱ्यांच्या शेतीचे हत्ती पासून नुकसान झालेल्याना तातडीने अनुदान देण्यात यावे यासह शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणारा विलंब, महसूल व इतर शासकीय विभागातील प्रलंबित प्रकरणे आदी विविध प्रश्न आमदार रामदास मसराम यांच्या समोर मांडले.दरबारात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम. जलसंपदा विभाग, पोलिस विभाग नगरपरिषद आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची सविस्तर नोंद घेण्यात आली. काही तक्रारींचे निवारण तत्काळ करण्यात आले, तसेच ज्या अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या कामात हयगय केली असेवर तातडीने कारवाई करावी जे कर्मचारी जनता दरबाराला उपस्थित नव्हते असेना शोकास नोटीस पाठवून त्याच्यावर काय कारवाई केली यांचे पष्टिकरण सात दिवसांत मला अवगत करावे असे निर्देश आमदार रामदास मसराम दिले तसेच यावर गुंतागुंतीच्या प्रकरणांवर ठराविक कालावधीत कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.या प्रसंगी आमदार रामदास मसराम म्हणाले,आरमोरी विधानसभा क्षेत्रातील लोकांनी मला दिलेला विश्वास फेडणे ही माझी जबाबदारी आहे. जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाने त्वरित, पारदर्शक आणि जबाबदारीने उपाय करणे आवश्यक आहे. जनता दरबार हा लोक आणि प्रशासन यांच्यातील थेट संवादाचा प्रभावी दुवा आहे. हा उपक्रम नियमितपणे राबवून जनतेच्या प्रत्येक अडचणीला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल,असे त्यांनी सांगितले.दरबारात महिलांनी शासकीय योजनांमधील अडथळे मांडले, शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा व पीकविमा याबाबत मागण्या केल्या, युवकांनी रोजगाराच्या संधी व कौशल्यविकासाशी संबंधित प्रश्न मांडले. अनेकांना तिथेच तातडीने मार्गदर्शन व मदत मिळाली.या ऐतिहासिक दरबारात उपस्थित : तहसिलदार उषा चौधरी सवगविकास अधिकारी मगेश आरेवार तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम पोलिस निरीक्षक कैलास गवते नायब तहसीलदार हरीदास दोनाडकर ललीत कुमार लांडे काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भूपेश कोलते,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष शालिक पत्रे, पंचायत समिती माजी सदस्या वृदा गजभिये निशांत वनमाळी विजय सुपारे लाहानु पिलारे यांसह आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य, नगरपरिषद माजी पदाधिकारी,कर्मचारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांनी आमदार रामदास मसराम यांचे आभार मानत जनता दरबारचे कैतुक केले