शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन 24 जुलै रोजी

Mon 21-Jul-2025,08:09 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी पत्रकार परिषदेत प्रहार चे जिल्हाध्यक्ष तथा इतर पदाधिकाऱ्यांची माहिती

आरमोरी :-- शेतकरी कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांचे इतर मागण्यांसाठी दिनांक 24 जुलै रोजी महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन उभारण्यात येणार असून त्या चक्काजाम आंदोलनाचा एक भाग म्हणून आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव ठाणेगाव येथील बस स्टॅन्ड वर दिनांक 24 जुलै 2025 रोज गुरुवार ला सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत माहिती दिली पत्रकार परिषदेत माहिती देताना निखिल धार्मिक ,विजय सुपारे आणि इतर पदाधिकारी म्हणाले की गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या बाजूने प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरू असून यामध्ये प्रामुख्याने जात,पात धर्म, राजकीय विचार बाजूला ठेवून सर्व शेतकरी बांधवांनी तसेच कामगार वर्ग ,महिला ,बेरोजगार वर्ग, युवा दिव्यांग ,बांधव, मेंढपाळ, मच्छिमार कामगार ग्रामपंचायतचे कर्मचारी सर्व घटक यांना एकत्र येण्याची वेळ आली आहे त्यांच्या हितासाठी बच्चू कडू हे अहोरात्र झटत असून त्या माध्यमातून प्रामुख्याने रायगड येथे तीन दिवशी अन्न त्याग केला. सर्व आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन मशाल मोर्चा काढण्यात आला .मंत्रिमंहोदयाच्या घरासमोर अन्नदान आंदोलन करण्यात आले, गुरुकुंज मोझरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत 7 दिवस उपोषण तसेच पापड ते चिलगव्हॅlन येथे शेतकरी आत्महत्येच्या गावातून सातबारा कोरा कोरा या शीर्षकाखाली पदयात्रा जवळपास 140 किलोमीटर काढण्यात आली तरी पण अजून पर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांचा पूर्णपणे कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही आणि गप्प बसलेले सरकार यांना आता जागा करण्याची वेळ आलेली आहे यासाठीच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यामध्ये डोंगरगाव भुसारी ,ठाणेगाव बस स्टॅन्ड या ठिकाणी दिनांक 24 जुलै 2025 रोज गुरुवार ला वेळ सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे प्रहार चे जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक ,उभाटा सेनेचे सागर मने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विजय सुपारे ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत बनकर , उबाठा चे तालुकाअध्यक्ष भूषण सातव, मनसेचे तालुकाध्यक्ष भाग्यवान कामथे,भारत कुमरे, प्रहारचे जिल्हा सचिव अपंग आघाडीचे अनंत भोयर, गोरक्षा कुकडकर विवेक ठाकरे प्रहार चे तालुकाप्रमुख ,विकी उंदीरवाडे , होमराज माकडे यांनी दिलेले आहे सदर चक्काजाम आंदोलनामध्ये प्रामुख्याने आरमोरी तालुक्यातील माजी विस्तार अधिकारी मधुकर दोनाडकर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अमोल मारकवार ,काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शालीक पत्रे शिवसेना उभाटा गटाचे सागर मने ,तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीताई मने कवडू भाऊ सहारे उपसरपंच माजी देऊळगाव भूषण सातव राजू सामृतवार सुधीर ठाकरे ,संतोष सेलोटे, हे सुद्धा सदर आंदोलनामध्ये प्रामुख्याने सहभागी होणार आहे सदर आंदोलनास यस आले नाही तर येणाऱ्या 2 ऑक्टोंबर ला 40 हजार ट्रॅक्टर घेऊन मुंबईच्या मंत्रालयावर धडक देणार व लढा असाच सुरू राहील अशी माहिती सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत दिली