हिंगणघाट पोलिसांच्या हाती मोटर सायकल चोर

प्रतिनिधी आसिफ मलनस हिंगणघाट
हिंगणघाट - पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दिनांक 12/ 7/ 2025 रोजी फिर्यादी - गौरव गजानन थोटे यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंद झाला असता पोलिसांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो गाडी क्रमांक एम एच 32 ए. ए. 15 94 जुनी वापरते किंमत 40000/रु. ही पोलीस कौशल्याचा वापर करून आरोपी नामे उमेश शिवदास पवार वय 33 वर्ष राहणार मांडगाव असे ताब्यातून जप्त करून आरोपीस विचारपूस केली असता त्याने पोस्टे सेवाग्राम येथून मार्च 2024 मध्ये हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक एम एच 32 ए यु 2397 ही चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपीचे ताब्यातून हिंगणघाट येथील अप क्र. 951/25 मधील चोरीस गेलेली मो.सा. क्रमांक एम एच 32 ए. ए. 1594 की. 40000/रु. व पोस्ट सेवाग्राम येथील अप. क्रमांक 186/24 मधील चोरीस गेलेली मो.सा. क्रमांक एम एच 32 ए यु. 2397 की. 40,000/रु. अश्या दोन मोटर सायकल जप्त केल्या पुढील तपास सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन सा.वर्धा व रोशन पंडित सा. उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार देवेंद्र ठाकूर साहेब यांचे निर्देशाप्रमाणे हिंगणघाट पोलीस स्टेशनचे कर्मचारी पो.हवा. यशवंत गोल्हर,पोलीस नाईक विकास अवचट,नरेंद्र आरेकर,राकेश आष्टणकर, गजानन कामठाणे यांनी केली.